• 3 years ago
खासदार संभाजी राजेंच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी तसेच समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते उपोषणावर ठाम आहेत. बेमुदत उपोषणाचे अस्त्र पुकारणाऱ्या संभाजी राजेंची आज तब्येत बिघडली आहे. त्यांनी पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल होत आहेत. आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी देखील उपस्थित होते. वारकरी संप्रदायांने अभंग म्हणत संभाजीराजेंना या आंदोलनात पाठिंबा दिला. यानंतर संभाजी राजेंनी वारकरी संप्रदायांचे कौतुक देखील केले आहे. कौतुक करत असताना संभाजीराजे भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते यावेळी म्हणाले, 'छत्रपतींच्या डोळ्यात केव्हाच अश्रू नसतात. हे अश्रू संत तुकाराम आणि वारकरी संप्रदायाला नतमस्तक होण्यासाठी होते.

Category

🗞
News

Recommended