'छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहे. माझा माहिती व अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिलं, असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. त्यावर आपल्या विधानाबद्दल माफी मागणार आहात का असे विचारले असता, राज्यपालांनी बाजू देऊन काढता पाय घेतला. माफी मागण्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देताच ते निघून गेले.
Category
🗞
News