छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी आहे. या संदर्भामध्ये राज्यपालांनी अधिक अभ्यास करून वक्तव्य केले असते तर दिशादर्शक झालं असतं. माहिती घेऊन बोलतो अशी टाळाटाळ करणे योग्य नसल्याचे मत नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांनी आता माहिती घेण्यापेक्षा आधीच माहिती घेऊन बोलले असते तर अधिक चांगले झाले असते. असंही ते म्हणाले.
Category
🗞
News