गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी गडचिरोली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांच्यासमोर स्थानिक आदिवासी तरुणांनी पारंपरिक 'रेला' नृत्य सादर केलं. यावेळी शिंदेना तरुणांनी पारंपरिक आदिवासी टोपी परिधान करण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी नृत्यावर फेर धरला.
Category
🗞
News