• 3 years ago
आमरण उपोषणासाठी बसलेले राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मागण्या ठाकरे सरकारने मान्य केल्या, उर्वरित मागण्यांवर योग्य त्या दिशेने कार्यवाही सुरू असल्याचं सांगितलं आणि यानंतर राजेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी हे उपोषण सोडवलं. पण आता उपोषण सोडवल्याच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने असा दावा केलाय, जो ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावतील. ठाकरे सरकारच्या मनात नेमकं काय आहे, संभाजीराजेंना महाविकास आघाडी सरकारसोबत घेऊ असं का सांगितलं जातंय आणि संभाजीराजे राजकीयदृष्ट्या कोणत्या पक्षाशी जोडलेले आहेत ते सविस्तर या व्हिडीओतून जाणून घेऊच, पण संभाजीराजेंविषयी हा दावा करणाऱ्या मंत्र्याचं नाव काय आहे तेही जाणून घ्या..

Category

🗞
News

Recommended