गोडेतेलाचे दर वाढलेले असतानाच टँकर पलटी; लोकांनी मिळेल त्यात भरुन तेल पळवलं

  • 2 years ago
आज सकाळी डांगुर्णे गावाजवळ गोड्या तेलाचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला. टँकर पलटी झाल्याने गोडेतेल रस्त्यावर कडेला पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी गर्दी केली. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात गोडेतेल जमा करण्यासाठी गर्दी केली. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असतानाच नागरिकांना महिन्याभराचे तेल मिळाल्याने दिलासा मिळाला.

Recommended