राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेजारी नव्याने उभारल्या जाणाऱ्या नवनगरला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद सीमेवरील अनेक गावांमधील सुमारे साडेपाच हजार एकर जमीन यासाठी संपादित होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. नागपूर-मुंबई या साधारण ७०० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागपूरपासून ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील रस्ता खुला होणार आहे. या महामार्गाच्या बाजूला अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कृषी समृद्धी केंद्र बनवली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण प्रस्तावित आहे. मात्र औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध केला आहे.
Category
🗞
News