• 3 years ago
रायगड जिल्ह्यातील खोपोलीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील अल्टा फार्मास्युटिकल लॅब या कंपनीत भीषण आग लागली. आगीत कंपनीतील संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. आठ रिअॅक्टर पूर्णपणे भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर, तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आग भीषण असल्याने चार ते पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट दिसत होते. खोपोली नगरपालिका, अलाना कंपनीच्या अग्निशमन यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

Category

🗞
News

Recommended