• 3 years ago
भंडारा जिल्ह्यातील सुपुत्र संदीप उर्फ्र चंद्रशेखर भोंडे हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगण वरुन जात असताना सरकुली येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. निधनानंतर 72 तासांनी संदीप यांचे पार्थिव भंडाऱ्यातील घरी आण्यात आले. रविवारी भंडारा शहरातील स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आर्मीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 2016 ला संदीप यांचे लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षांचा मुगला आहे. संदीप यांच्या निधनाने भंडाऱ्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Category

🗞
News

Recommended