"भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत सत्तेत आहोत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या सरकारमध्ये यायचं नव्हतं. मात्र भाजपला सत्तेपासून दूर करायचं होतं. त्यामुळेच आम्ही यांच्यासोबत आलो. त्यामुळेच सोनिया यांनी सांगितलं होतं की, आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नको, पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट घातली होती", असं विधान नाना पटोले यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात केलं. बीडच्या गेवराईत आज 14 वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतो. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.
Category
🗞
News