जिल्ह्यातील सेनगाव येथील तहसील कार्यालयामध्ये आग्या मोहोळाच्या माशांनी हल्ला चढवला. इमारतीवर बसलेल्या आग्या मोहोळाने परिसरातील नागरिकांवर हल्ला चढवला. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलयं. यात माधव कंठाळे, गणेश वैद्य, बालाजी गुट्टे, हर्ष अंभोरे, घनश्याम अशी काही जखमींची नावे आहेत. ही घटना घडताच नागरिक जिवाच्या आकांताने परिसरात सैरावैरा धावत होते. घडलेल्या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात नागरिकांचा एकच गोंधळ उडाला होता.
Category
🗞
News