• 3 years ago
महाज्योती विद्यार्थी संघर्ष समिती तर्फे आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला विद्यार्थी बसले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेमार्फत दिल्या जाणारी फेलोशिप यूजीसी, सारथी आणि बार्टी या संस्थेच्या नियमानुसार प्रदान करण्याबाबत बेमुदत उपोषण धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली आहे. पीएचडी अधिछात्रवृत्ति करिता सर्व निवड झालेल्या उमेदवारांना विद्यापीठाकडून ना नोंदणी झाल्यापासून सर्व भत्ते मिळण्याबाबत महाज्योती विद्यार्थी संघर्ष समिती कडून हे बेमुदत उपोषण करण्यात आले आहे. या उपोषणकर्त्यांची महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने बातचीत केली आहे.

Category

🗞
News

Recommended