• 3 years ago
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. यावर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली. हिजाब बंदीमुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील. तसेच उच्च न्यायाल्याने दिलेला निर्णय निराशाजनक आहे. यावेळी बोलताना जलील म्हणाले की, देशात राहणाऱ्या प्रत्येकाला जगण्याचा आणि त्यांच्याप्रमाणे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. हिजाबला धार्मिक रंग देऊ नये. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. तसेच याबाबत आम्ही अनेक वकिलांशी बोललो तेव्हा त्यांनी हा चुकीचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

Category

🗞
News

Recommended