• 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा प्रचंड गाजत आहे. बहुतांश भाजपा शासित राज्यांमध्ये द काश्मीर फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सिनेमावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, द काश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. अशा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.

Category

🗞
News

Recommended