• 3 years ago
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डस्टर मोटारीने अचानक पेट घेतला. मोटारीतून धूर येताना पाहून चालकाने प्रसंगावधान दाखवत मोटार रस्त्याच्या बाजूला उभी केली. मोटारीने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच ती पूर्ण जळून खाक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारला लागलेल्या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Category

🗞
News

Recommended