देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. त्यांनी तेल लावलेल्या पैलवानासारखं मैदानात यावं. ते सध्या खेळत असलेल्या नुरा कुस्तीतून काहीही साध्य होणार नाही. त्यांना कुस्तीच खेळायची असेल तर त्यांनी मैदानात यावं, असं आव्हान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. सभागृहात विधानसभा अध्यक्षांना एक पेन ड्राईव्ह दिला. त्यांनी सभागृहात नुसती नुरा कुस्तीच खेळायची का? तो पेनड्राईव्ह जर फॉरेन्सिक लॅबला गेला की तो फेक आहे, असाच रिपोर्ट येणार आहे. त्यामुळे हा पेन ड्राईव्ह जनतेसमोर आणावा जेणेकरुन फडणवीस यांची नुरा कुस्ती न होता खऱ्या अर्थाने तालमीतल्या पहेलवानासारखी त्यांची कुस्ती होईल, असंही आंबेडकर म्हणाले.
Category
🗞
News