औरंगाबादमध्ये दहावीच्या पहिल्याच पेपरला ‘कॉपी पॅटर्न’ पाहायला मिळाला. पैठण तालुक्यातील निलजगावातील लक्ष्मीबाई शाळेत चक्क शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे पाहायला मिळालं. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी पोहचताच शिक्षक कॉपी घेऊन अक्षरशः पळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. याबाबत प्रतिनिधींने विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर न देता शिक्षकांनीच तिथून पळ काढला. पाहा महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे स्टिंग ऑपरेशन...
Category
🗞
News