देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब अगदी फुसका होता. त्यात काहीच नव्हतं. मी देखील एक सीडी देणार आहे. मात्र ही ती योग्य वेळ नाही. योग्य वेळ आली की मी ती सीडी त्यांना देईन. दाऊदच्या बायको सोबत देखील माझं नाव जोडलं गेलं होतं. फोन टॅपिंग प्रकरणाची तक्रार मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती मात्र त्यांनी लक्ष दिलं नाही. जेव्हा अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यावेळेसही देखील मी त्यांना पत्र लिहिलं होतं.
Category
🗞
News