पोलिस स्थानक म्हटलं की अनेकांना भीती वाटते. मात्र येवला पोलिस स्थानकात फळा-फुलांची बाग बहरली आहे. पोलिस निरिक्षक अनिल भवारी यांच्या कल्पनेतून ही बाग फुलली आहे. सर्वांच्या मदतीने बाग फुलवल्याने पोलीस स्थानकाची एक आगळीवेगळी ओळख बनली आहे. सफरचंद, खजूर, अंजीर या फळांसह विविध दुर्मिळ झाडं आणि फुलझाडांचा यात समावेश आहे.
Category
🗞
News