सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अहमदनगर जिल्ह्यातून मोठा जणसमुदाय लोटला आहे. याचा आढावा महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन ने घेतलाय.
Category
🗞
News