• 3 years ago
संजय राऊतांवर बोलायचं नाही असं आम्ही ठरवलंय. बाकी काही विचारा. त्यांच्यावर बोलून बोलून आपण त्यांना लई मोठा केला. रोज सकाळी प्रवचन. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाला बोलवतात आणि सुरू होतात. त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो हे तुम्हाला माहीत आहे ना. आपल्याला वाटतं दिवा फार मोठा झाला. पण तो विझण्याच्या दिशेने जात असतो, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली.

Category

🗞
News

Recommended