भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलं आहे. भाजपची कार्यपद्धती आणि तत्त्वज्ञान देशहिताचं नाही. त्यामुळे भाजप सत्तेवर न येणं हीच काळाची गरज आहे. माणसामाणसात भेद निर्माण करणं, विष कालवणं हे राज्यघटनेस मान्य नाही. म्हणून भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं असावं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण आहे. नंतर ती नसायला हवी. सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
Category
🗞
News