उस्मानाबादेतील औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या ऊसाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे शेतकरी श्रीकांत महाजन यांच्या शेतातील उभा ऊस डोळ्यांदेखत जळाला. तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकरी आक्रोश करण्यापलीकडे काहीच करू शकला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. शेतात असलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. बाजूलाच असलेल्या फय्युम शेख यांच्या भंगाराचे दुकानही या आगीत जळून खाक झाले. या आगीत कोणत्याही जिवीतहानी झाली नसून यात लाखोंचं नुकसान झालं आहे.
Category
🗞
News