• 3 years ago
इस्लाम धर्मच हिंदुस्थानाचा खरा शत्रू असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांना हाल अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज हा खरा कारणीभूत आहे आणि तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आहे. दरम्यान, आपणही त्यांच्यापासून सावध राहून त्यांना हिंदु समाजामध्ये पोटतिडकीने झालेल्या बलिदानाचा सूड घेण्याची जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल. असा एक दिवस नक्की उगवेल, असं वक्तव्यही भिडे यांनी केलं. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Category

🗞
News

Recommended