मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लोकल ट्रेननं जलद प्रवास होत असल्यानं प्रवाशांचा जास्त भार हा लोकल रेल्वेवर असतो. हा लोकल प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वेनं एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. पण नॉन एसी लोकलच्या तुलनेत एसी लोकलला फारच कमी प्रतिसाद मिळतो.सध्या मुंबईतील तापमानाचा पारा वाढला आहे. दुपारी साध्या लोकलमध्ये उन्हाच्या अतितीव्र झळा लागत असल्याने काही प्रवासी एसी लोकलकडे वळण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबई एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात महिनाभरात कपात होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे बोर्ड मुंबईतील एसी लोकलसाठी तिकीट दर कमी करण्याच्या विचारात आहे.
Category
🗞
News