विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे. आणखी चार पेन ड्राईव्ह पुढे येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तिकडून एखादा आरोप झाला की आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिलाय. पेन ड्राइव्हमध्ये सत्यता नव्हती तर मग अॅड. प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही दानवेंनी उपस्थित केला. त्यासाठीच आम्ही चौकशीची मागणी केली असून त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
Category
🗞
News