• 3 years ago
सातारा जिल्ह्यातील वळसे येथे शॉर्टसर्किट झाल्याने 50 एकर ऊस जळून खाक झाला. तोडणीला आलेला ऊस आगीत जळाल्याने 24 शेतकर्‍यांचं मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी लागलेल्या या आगीत अनेक शेतक-यांचं लाखोंचं नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने ऊसाला आग लागण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे. नुकसानग्रस्त पिकाची आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Category

🗞
News

Recommended