कोणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे कोणताही पक्ष सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचं आहे त्या पक्षाने तरी त्यांना होय म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला याबाबत निर्णय घेता येऊ शकत नाही जोपर्यंत राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही. अशाप्रकारच्या बाबतीत राज्य कोणताही भूमिका घेवू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या दोन दिवस ज्या एमआयएमबाबत बातम्या येत आहेत तो पक्षाचा निर्णय नाही. असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Category
🗞
News