• 3 years ago
चीन, थायलंड, दक्षिण कोरिया, पूर्वोत्तर भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारला सतर्क राहण्याची सूचना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. चीन, दक्षिण कोरियासह इतर देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. चीनमधील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आढावा बैठक घेतली. कोरोना परिस्थितीबाबत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जळगाव येथे दिली.

Category

🗞
News

Recommended