• 3 years ago
धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील कापडाच्या दुकानांना अचानक आग लागली. या आगीत आठ ते दहा कापडाची दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. आगीत बहुतांश दुकाने असल्याने आग विझविण्यात देखील अडचणी येत आहेत. दुकानांना लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाले. यापूर्वी देखील याच परिसरामध्ये अशाच पद्धतीने आग लागली होती.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून लाखोंचे नुकसान झालयं. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून यात आणखी नुकसान होण्याची भीती आहे.

Category

🗞
News

Recommended