शंकरपाळ्या आणि कारल्या या दोघांचे भांडण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि अखेर ते मिटवले देखील, आता या दोघांच्या भांडणानंतर असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत. हा व्हिडिओमधील मुलांपैकी दोन मुलांची नावे श्रेयस मिरगे आणि आयुष मिरगेअसून ते दोघेही सख्खे चुलत भाऊ तर यश कानडे हा त्यांचा आतेभाऊ. दुकानातून सुपारी घेऊन आल्यानंतर श्रेयस घरी निघाला होता. मात्र यादरम्यान आयुष आणि यश या दोघांनी त्याला रस्त्यातच गाठून हा कल्ला सुरू केला. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने या तिघांचा वाद मिटला आहे. मात्र मस्करीत केलेला व्हिडिओ एवढा आता प्रचंड व्हायरल होतोय., शंकरपाळ्या आणि कारल्या या दोघां प्रमाणेच हा व्हिडिओ अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे.
Category
🗞
News