• 3 years ago
साईबाबांच्या​शिर्डीत आज रंगपंचमीनिमित हजारो भक्तांनी रंग खेळून रंगपंचमी उत्सव साजरा केला. द्वारकामाई मंदिरापासून साईबाबांच्या रथाची वाजत - गाजत मिरवणूक काढण्यात आली. पुढे रंगाची उधळण करणारे साईभक्त तर मागे साईंचा रथ असे हे दृश्य सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. एकीकडे साईंच्या रंगपंचमीची धुम सुरु असताना, शिर्डीतल्या चौकाचौकातही रंगपंचमीला उधाण आले होते. संपूर्ण शिर्डीत रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळत होता.

Category

🗞
News

Recommended