• 3 years ago
गुगलला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारलात की ती माहिती एका सेकंदात तुमच्या समोर असते. मात्र तीच मानवी मेंदुसाठी जशाच तशी साठवून ठेवणं हे अवघड आहे. त्यातल्या त्यात शेतीचा सातबारा, हेक्टर आर, जमिनीचे सर्वे नंबर, खाता नंबर तोंडपाठ ठेवणं हे जास्तच अवघड. परंतु याला अपवाद ठरलेत चंद्रपूर महसूल विभागातले एक कोतवाल. नुसतं नाव सांगितलंत तरी जमिनीची डिटेल तुमच्या समोर येतेय तिही अगदी तोंडपाठ. हे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील चंद्रकांत मुंजनकर. ते धाबा तलाठी येथील कार्यालयात कार्यरत आहेत. महसूल विभागातील या कर्मचाऱ्याला गुगल कोतवाल असं म्हणतात. शालेय शिक्षणापासूनच मुंजनकर यांना पाठांतराची सवय होती. ती आजही कायम आहे. सोळा वर्षापासून मुंजनकर कोतवाल याच पदावर कार्यरत आहेत. तलाठी कार्यालयातील 75 टक्के सातबारे त्यांना तोंडपाठ असल्याचं ते सांगतात. चंद्रकांत मुंजनकर यांच्या या कामामुळे स्थनिकांचं आणि कर्मचाऱ्याचं काम अगदी सोयिस्कर झालयं. त्याच्या या कामामुळे जिल्ह्यात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.

Category

🗞
News

Recommended