• 3 years ago
एमआयएमकडून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेनेला आलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आता खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट जलील यांनी केला असल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर झाले आहेत. राजकारणात एखाद्यावर त्यांची कृपादृष्टी झाल्यास त्याचे नशीब बदलून टाकतात. मात्र एखाद्यावर सत्तार नाराज झाल्यास त्याची वाईट काळ सुरू होते, असेही जलील म्हणाले.

Category

🗞
News

Recommended