सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील तोडणीला आलेला 60 एकर ऊस जळून खाक झाला. दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शिवारात आग लावल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये गोजेगाव येथील जवळपास 80 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचा संप सुरु असल्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांना मदतीसाठी हात मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
Category
🗞
News