• 3 years ago
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहाबाहेर ही मारहाण केली. मुख्यमंत्र्यांविरोधात कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट टाकली नसतानाही त्यांनी मारहाण सहन केली. आम्ही अल्पसंख्याक खरंच सुरक्षित आहोत का असाही सवाल गौरी दुतीया यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने केल्याची माहिती गौरी दुतीया यांनी दिली. कुटुंबासोबत आलेल्या या दाम्त्याला मारहाण झाल्याने संबंधितांवर कठोर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलयं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री शिवसेनेचे असतानाच अशा पद्धतीने कायदा हातात येत असतील तर पोलिसांची गरज काय? असा प्रश्न उपस्थित राहिलाय...

Category

🗞
News

Recommended