• 3 years ago
आज गडचिरोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. याचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. सरकारमध्येच सध्या भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याचं आहेत, जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. मुंबईतून बिल्डरांचा थकलेला कर घ्या आणि शेतकऱ्यांना वीज द्या. पण हे सरकार बिल्डरांवर मेहरबान आहे, कारण ते त्यांना मालपानी देतात.

Category

🗞
News

Recommended